Priyanka2019


May 7th, 2019 1:54pm

Nandkishor Dhekane 18 March ताक पिण्याचे हे ८ प्रकारचे फायदे जाणून घ्याच----


May 7th, 2019 1:53pm

उंबराचे औषधी गुणधर्म 'उंबर आहे जिथे तिथे दत्तगुरूचा वास असे 'असे हिंदूधर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला अध्यात्मिक महत्त्व आले आहे. गालाच्या विविध विकारावर - उंबराचा चीक गालासाठी मोठे औषध आहे. लहान मुलांचे गाल सुजले असता त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावतात ज्यामुळे सूज कमी होते. शरीरातील कोणत्याही गाठीवर - आपल्या शरीरात जर कुठे गाठ आली असेल तर अशा कोणत्याही गाठीवर उंबराचा चीक लावला तर गाठ बसून तिचा निचरा होतो. लहान मुलांना आव झाली असता - लहान मुलांना अनेकदा आव होते. या आवेवर उंबर उपयुक्‍त आहे. उंबराच्या चिकाचे पाच-सहा थेंब साखरेतून त्या लहानग्याला खाण्यास द्यावे, लगेचच आव थांबते. उष्णतेने तोंड आले असता - उष्णतेने तोंड आले असता उंबराच्या पानावर आलेल्या फोडांचा उपयोग करावा. उंबराच्या पानावरील फोड वाटून त्याची चटणी करावी. आणि त्यात थोडा मध व खडीसाखर घालून ज्याचे तोंड आले असेल त्याला ती चाटण्यास द्यावी. जर तोंडाचा दाह जास्त होत असेल तर दिवसातून दहा-बारावेळा हे चाटण चाटवावे. तोंड आलेले जाते. अंगातील कडकीवर - कोणत्याही प्रकारच्या कडकीवर उंबराची फळे खायला देतात. चांगली पिकलेली उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेबरोबर खावीत. सर्व प्रकारची कडकी बरी होते.उंबराच्या मुळाचे पाणी मिळाल्यास अंगात कडकी राहात नाही. सतत तहान-तहान होत असेल तर तृष्णा थांबविण्यासाठी उंबराची साल अगर कच्ची फळे पाण्यात उगाळून त्याचे चाटण द्यावे. यामुळे तेलकट खाऊन अगर तापामुळे जर का तहान लागत असेल तर तीही थांबते. डांग्या खोकल्यावर - डांग्या खोकल्यावर उंबराचा चीक टाळूवर लावावा. लगेच खोकला ताबडतोब थांबतो. उपदंश किंवा गर्मीवर - उपदंश म्हणजेच गर्मीवर उंबराची पिकी फळे पाण्यात उगाळून चाटण द्यावे. किडनी स्टोनवर - उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला सायंकाळी खाच द्यावी. त्यातून रस जिरपेल अशी खाच पाडावी आणि रात्रभर भांडे झाडाला लावून ठेवावे. सकाळी उठल्यावर उंबराचे ते औषधी जल जे साचते. ते प्यावे. असे काही दिवस नियमित केल्यास किडनी स्टोनचा विकार होत नाही. लघवीच्या जागी आग, तिडीक मारणे, लघवीला ठणका, लघवीच्या जागेवरील व्रण इत्यादी तक्रारींवर उंबराच्या सालीचा काढा करून तो घेतल्यास त्वरित बरे वाटते. 40 ग्रॅम उंबराच्या सालीचा 1 लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवून त्यात खडीसाखर घालून दोन वेळा एक चमचा काढा घ्यावा. गोवर कांजिण्यात - गोवर कांजिण्या ह्या उष्णताजन्य रोगात उंबराचा काढा सकाळ -संध्याकाळ एक छोटा चमचा घ्यावा. जुन्या उंबराच्या झाडाचे खोड सायंकाळी कापून त्यातून रस झिरपेल अशी खाच पाडावी आणि रात्रभर भांडे लावून ठेवावे. उंबराचे औषधी जल साचते. ते प्यायले असता उष्णतेचे विकार कमी होतात. सर्व रोगांवर उपयुक्‍त उंबराचे सत्व - उंबराचे सत्व काळजीपूर्वक करावे. हे सत्व करण्याची कृती अशी, 5 किलो उंबराची पाने घ्यावीत ती स्वच्छ धुऊन चटणीसारखी बारीक वाटावीत. नंतर 20 लिटर पाण्यात ही चटणी मिसळून ते मिश्रण 10 लिटर शिल्लक राहील एवढे उकळवावे. नंतर गाळावे. आता गाळलेले पाणी परत उकळवावे. ते दाट होईपर्यंत सतत ही क्रिया करावी. ह्यालाच रसक्रिया म्हणतात. हे उंबराचे सत्व, नाडीव्रण, भंगदर, कोणत्याही प्रकारचा व्रण असो वा सूज, तरी मुकामार लागला किंवा शरीरात नको त्या अवघड जागी गाठ आली तसेच गंडमाळा, कंठमाला यासारख्या रोगांचा निचरा या उंबराच्या सत्वाच्या लेपाने होतो. त्याची पट्टी अथवा लेप लावून वर कापूस लावावा. या सत्वाची गोळीदेखील अत्यंत गुणकारी आहे. तोंडात उष्णतेमुळे लालसरपणा व जखमा अथवा फोड आहे असतील तर उंबरसत्वाची गोळी तोंडात धरावी.हळूहळू चोखावी. यामुळे तोंडाचे उष्णतेचे विकार बरे व्हायला मदत होते. व्रणशोथ, मुकामार, पापणीच्या सुजेवर, दंतरोगावर मूत्रविकारावर - उंबरापासून आयुर्वेदात एक गुणकारी व योग्य औषध तयार केले जाते. त्याचे नाव औदुंबरामृत. ते कसे तयार करतात? औदुंबरामृताची कृती : उंबराची हिरवी, कोवळी पाने चार किलो स्वच्छ धुवून बारीक कुटावीत. ही 64 लिटर पाण्यात उकळावी, 16 लिटर पाणी राहिल्यावर स्वच्छ कपड्यात तयार झालेला कषाय गाळून घ्यावा. चोथा फेकून द्यावा. परत आठ लिटर राहीपर्यंत कषाय उकळावा. हा कषाय घमेल्यात काढावा. हे घमेले एका मोठ्या गंजात पाणी टाकून त्यात 4/6 विटा ठेवाव्यात. त्या विटांवर हे कषाय असलेले पातेले ठेवून गंजाखाली विस्तव चालू करावा. गंजातील पाण्याची पातळी घमेल्याच्यावर जाऊ देऊ नये. गंजातील पाण्याच्या वाफेमुळे घमेल्यातील काढा अवलेहाप्रमाणे घट्ट होत आल्यावर घमेले उचलून घ्यावे. घमेल्यातील औषध थंड झाल्यावर त्यात टाकणलाहीचे चूर्ण 25 ग्रॅम घालावे व चांगले ढवळावे. नंतर स्वच्छ अशा बरणीत मिश्रण घालून ठेवून द्यावे. म्हणजे उंबराची रस क्रिया पूर्ण होते.ही सर्व कृती योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावी म्हणजे औदुंबरामृत अचूक होईल व त्याचे औषधी गुणही अबाधित राहतील.


May 7th, 2019 1:56pm

Nice


May 7th, 2019 1:51pm

हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल.... *कायम तारुण्याचा अनुभव* ...... 1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे. 2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे. 3. ब्रश करायच्या आधी एक लिटर गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे. 5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी. 6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस. 7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम) 8. 12.30 ला थोडे हलके जेवण. 9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे. 10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण. 11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे. 12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप. ★ या खबरदारी घ्या... *रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे, किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात.... म्हणजे शंभर पावले चालणे.... लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री.... * जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये. * रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे. * फक्त सिजनल फळेच खावी * सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे. * डाव्याकुशीवर झोपावे. * सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे. *** एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही, आणि वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.


May 7th, 2019 1:51pm

very important


May 7th, 2019 1:50pm

कडुलिंबाचं पान खायला देतात: या दिवशी आई, आजी-आजोबा हे तुम्हाला कडुलिंबाची पानं खायला लावतात. त्या मागचं शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं, पवित्र्याचं, समृद्धीचं प्रतिक आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अ्भिष्टचिंतन ही केले जाते. ह्या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.


May 7th, 2019 1:49pm

पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, " शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! " मग मात्र तो जावाई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! . आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत! मग, काय आहे, नेमके, या शेवटाच्या दहीभाताचे इंगित ? महत्व व गौडबंगाल ? यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक शास्त्रीय कारण आहे ! पण ते तसे आरोग्यदायी व अत्त्यावश्यक म्हणून सांगितले असते तर तत्कालीन समाजाने स्विकारलेच असते, मानलेच असते, किंवा दैनंदिन अंगिकारले असतेच, याची खात्री नव्हती ! मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय ! मग नेमके ते भाग्य, सत्य काय आहे ? जाणून घेण्यासाठी.... आता वाचाच हे...! . . दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणतात शास्त्रज्ञ? आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे. जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते. आता तुमच्यापैकी अनेकजणांना असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे? याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता. त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात जरुर खा. दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


May 7th, 2019 1:49pm

*धने-जिरे* भरड पूड


May 7th, 2019 1:38pmMay 7th, 2019 1:37pmMay 7th, 2019 1:37pmMay 7th, 2019 1:33pm

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस आहे. जगात उद्भवणा-या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्याविषयी जागतिक पातळीवर जनजागरण करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडील आकडेवारी नुसार २०१० सालापर्यंत जगातील विविध रोगांच्या प्रादुभार्वापैकी ७० टक्के रोग हे असांसर्गिक असतील. सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट कमी होत चालले आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, पिठ मळणे, दळणे, कुटणे ही कामे यंत्रच करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे. पण त्यामुळे काही अंशी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ हरविले आहे. प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. शासन त्यावर उपाय योजित असते. मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे कार्बन वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या निर्माण झाली आहे. शासन पातळीवर अनेक निर्णय घेऊन नवीन योजना आणल्या जात आहेत.

This member hasn't added any friends yet.

Priyanka2019's Interests

  • A General Interest
  • Brain Cancer
  • Bronchitis